Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील ही व्यक्ती 'प्लाझ्मा बँक', आईकडून प्रेरणा घेत 14 वेळा प्लाझ्मा दान केले

पुण्यातील ही व्यक्ती 'प्लाझ्मा बँक', आईकडून प्रेरणा घेत 14 वेळा प्लाझ्मा दान केले
, सोमवार, 10 मे 2021 (18:44 IST)
देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे थैमान सुरूच आहे. साथीच्या रोगात कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. काही लोक आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत आणि काही लोक इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावत आहे. अशी एक व्यक्ती आहे, ज्यांनी अनेक लोकांना प्लाझ्मा दान करून नवीन जीवन दिले आहे. त्यांनी 14 वेळा प्लाझ्मा दान करण्याचा विक्रम केला आहे. त्यांना याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाली.
 
पुणे शहरातील 50 वर्षीय अजय मुनोत यांनी आतापर्यंत 14 वेळा आपला प्लाझ्मा दान केला आहे. शरीरातील अ‍ॅटीबॉडीज दान करून लोकांचे प्राण वाचवण्याच्या भावनेमुळे अजय यांनी अजून लस देखील घेतली नाही जेणेकरून प्लाझ्मा दान करण्यात अडथळा येऊ नये. असे म्हटले जात आहे की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही एकाच व्यक्तीने 14 वेळा प्लाझ्मा दान केल्याची पहिली घटना समोर आली आहे.
 
अजय मुनोत जुलै 2020 मध्ये कोरोना संक्रमित झाले होते. रिकव्हर झाल्यावर ते सतत लोकांच्या मदतीसाठी प्लाझ्मा डोनेट करत आहे. या नऊ महिन्यात त्यांनी 14 वेळा ब्लड बँकेत प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत शरीरात अँटीबॉडी बनत राहतील तोपर्यंत मी प्लाझ्मा दान करीतच राहीन. सामान्यतः निरोगी माणूस 14 दिवसांच्या कालावधीत आपला प्लाझ्मा दान करू शकतो.
 
त्यांनी सांगितले की त्यांची आई ‘O’ निगेटिव्ह ब्लड डोनर होती. युनिव्हर्सल डोनर असल्याने त्या सतत रक्त दान करायच्या. त्यांना पुण्याच्या आर्मी ऑफिसहून ब्लड डोनेट करण्यासाठी फोन येत असे. त्या रक्तदानासाठी जात असताना अजय देखील सोबतच असायचे म्हणून त्यांनी आईकडून प्रेरणा घेतली आणि भविष्यात असेच काही करण्याचे ठरविले होते जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. आज आईची प्रेरणा घेऊन ते प्लाझ्मा डोनेट करत आहे. आता तर त्यांचे मित्र आणि नातेवाईक त्यांना प्लाझ्मा बँक म्हणून हाक मारतात.
webdunia
अजय यांनी म्हटले की त्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही कारण त्यांना प्लाझ्मा डोनेट करणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यांनी दावा केला आहे की 14 वेळा प्लाझ्मा डोनेट केल्यामुळे त्यांचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

photo credit: @AjayMunot2

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या;तातडीने लस देण्यात यावी;मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी