Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची सूचना

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची सूचना
, गुरूवार, 6 मे 2021 (18:10 IST)
पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने यावेळी म्हटलं आहे. 
 
पुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं,
 
हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलंच सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार