Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू; 8 कामगार गंभीर जखमी

येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू; 8 कामगार गंभीर जखमी
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (09:47 IST)
पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात गल्ली क्रमांक 8 येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या जाळ्यांखाली अडकून सात कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच आठ जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 
 
पुणे-नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकाच्या अलीकडे वाडिया फार्मच्या जागेवर ब्ल्यू ग्रास कंस्ट्रकशनची इमारत उभारण्यात येत असून या इमारतीच्या बेसमेंटचे काम आता सुरू आहे. तेथे भूमिगत स्लॅब टाकण्यात येत होता. त्यासाठी आवश्यक लोखंडी छत तयार करण्याचं काम 15 कामगार करत होते. ते प्रामुख्याने लोखंडी गजांचे वेल्डिंग करत होते. त्यावेळी हे वजनदार लोखंडी छत कोसळले.
 
हा लोखंडी सांगडा इतका मोठा होता की त्याखशली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. जवानांनी कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला केला. एका मागोमाग एक त्यांनी सात जणांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असं येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितलं आहे.
photo: twitter

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये ट्रक आणि कॉलेजच्या बसचा भीषण अपघात