Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

नाशिकमध्ये ट्रक आणि कॉलेजच्या बसचा भीषण अपघात

Fatal accident involving truck and college bus in Nashik
नाशिक , शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (09:34 IST)
नाशिकमध्ये आज, शुक्रवारी सकाळी मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात २० ते २२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
नाशिकमध्ये ट्रक आणि कॉलेजच्या बसचा भीषण अपघात झाला. औरंगाबाद रोडवर कॉलेजची बस सकाळी सात वाजताच्या सुमारास धामणगावकडे जात असताना, सिग्नलवर बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. कॉलेज बस रस्त्यावरच उलटली. बसमधील अंदाजे २० ते २२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डबाबंद फळांचे रस, शीतपेय अशा शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होतो का?