Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील कंपनीने तयार केले विषाणूरोधक घटकांनी युक्त थ्रीडी-प्रिंटेड मास्क

पुण्यातील कंपनीने तयार केले विषाणूरोधक घटकांनी युक्त थ्रीडी-प्रिंटेड मास्क
, मंगळवार, 15 जून 2021 (08:10 IST)
एन -95, 3- पदरी आणि कापडी मास्कपेक्षा हे अधिक प्रभावी:  
थ्रीडी प्रिंटिंग आणि फार्मास्युटिकल्सच्या एकत्रीकरणातून नवीन प्रकारचा मास्क तयार करण्यात आले आहे. पुण्यातील थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेल्या या मास्कना बाहेरून विरुसाईड्स या विषाणूरोधक घटकांचे आवरण करण्यात आले आहे.
 
व्हायरुसीडल मास्क प्रकल्प हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेल्या तंत्रज्ञान विकास मंडळाकडून व्यावसायीकरणासाठी आर्थिक सहाय्य मिळालेल्या आणि कोविड विरोधातील लढाईतील सुरुवातीच्या प्रकल्पापैकी एक आहे.
 
कोविड विरोधातील लढाईत नवनवीन उपाय शोधण्याच्या प्रक्रीयेअंतर्गत या प्रकल्पाला मे 2020 तंत्रज्ञान विकास मंडळाकडून अर्थसहाय्य देण्यात आले. त्यानुसार 8 जुलै, 2020 रोजी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हे किफायतशीर आणि अधिक कार्यक्षम मास्क कोविड -19 चा प्रसार रोखण्यात सामान्य एन -95, 3-प्लाय आणि कापडी मास्कचा तुलनेत अधिक प्रभावी आहेत असा दावा 2016 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने केला आहे.
 
थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया ही कंपनी नवीन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आणि विविध औषधांचे ड्रग्स-लोडेड फिलामेंट्स शोधण्यासाठी फ्यूजड डिपोझिशन मॉडेलिंग (एफडीएम) थ्रीडी- प्रिंटर्स विकसित करण्याचे काम करते. संस्थापक संचालक डॉ. शितलकुमार झांबड म्हणाले “आम्ही महामारीच्या प्रारंभीच्या काळात या समस्येचा आणि त्यावरील संभाव्य उपायावर विचार करण्यास सुरवात केली. तेव्हा लक्षात आले की संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून सर्वत्र वापरला जाईल. बहुतेक मास्क जे त्यावेळी उपलब्ध होते आणि सामान्य माणसांच्या आवाक्यात होते ते घरगुती कापडी आणि तुलनेने कमी गुणवत्तेचे होते असे आम्हाला आढळले.
webdunia
उच्च-दर्जाच्या मास्कच्या आवश्यकतेमुळेच आम्ही संसर्ग रोखण्यासाठी किफायतशीर आणि अधिक प्रभावी व्हायरसीडल कोटेड मास्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला ”. असेही ते म्हणाले.
 
मास्क निर्मितीचा प्रवास
 
याच उद्देशाने थिंकर टेक्नोलॉजीजने विषाणूरोधक कोटिंग फॉर्म्युलेशन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. नेरूळ इथल्या मर्क लाइफ सायन्सेसच्या सहकार्याने थिंकर टेक्नोलॉजीजद्वारे ते विकसित केले गेले आणि यासाठी मर्क लाईफच्या संशोधन सुविधेचा वापर करण्यात आला. कोटिंग फॉर्म्युलेशनचा उपयोग फॅब्रिक थर कोटिंग करण्यासाठी केला आणि 3 डी प्रिंटिंग तत्त्व एकसंधपणा येण्यासाठी वापरले गेले
 
एन- 95 मास्क , 3-प्लाय मास्क , साध्या कपड्याचे मास्क , 3 डी प्रिंटेड किंवा इतर प्लास्टिक कव्हर मास्कमध्ये हा कोटेड लेयर पुन्हा वापरण्यायोग्य फिल्टरसह अतिरिक्त लेयर म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो. या पुन्हा वापरण्यायोग्य मास्कचे फिल्टरदेखील थ्रीडी प्रिंटिंग वापरुन विकसित केले आहेत.
 
सार्स -सीओव्ही -2 विषाणू निष्क्रिय करण्यासाठी कोटिंगची चाचणी केली गेली आहे . कोटिंगसाठी वापरलेले साहित्य सोडियम ऑलेफिन सल्फोनेट आधारित मिश्रण आहे. साबण बनवण्यासाठी लागणारा हा घटक आहे ज्यात हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक गुणधर्म आहेत. विषाणूच्या संपर्कात आल्यावर तो विषाणूचा बाह्य पडदा विस्कळीत करतो. यात वापरलेली सामग्री साधारण तापमानात स्थिर आहे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
 
हे मास्क फिल्ट्रेशन पेक्षा अधिक संरक्षण प्रदान करतात. डॉ. झांबड म्हणाले की, या मास्कमध्ये जीवाणू फिल्ट्रेशन कार्यक्षमता 95% पेक्षा जास्त आहे. “या प्रकल्पात प्रथमच आम्ही 3 डी- प्रिंन्टर्सचा वापर केला आहे ज्यामुळे प्लास्टिक -मोल्डेड किंवा 3 डी-प्रिंटेड मास्क कव्हरवर मल्टीलेयर कापड फिल्टर तंतोतंत बसतील. ”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार-शाहू महाराज भेटीवर छत्रपती संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….