Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात भरधाव पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले, एकाचा मृत्यू

In Pune
, बुधवार, 10 डिसेंबर 2025 (18:55 IST)
पुण्यात भरधाव पीएमपीएमएल बस ने रस्ता ओलंडण्याऱ्या दोन सक्ख्या बहिणींना जोरदार धडक दिली. या मध्ये 9 वर्षाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर मोठी बहीण गरोदर असून गंभीर जखमी झाली.
सदर घटना  मंगळवारी तळवडे येथील ज्योतिबा नगर येथे घडली. या अपघातात नऊ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. सुधा बिहारीलाल वर्मा (9) असे मृत्युमुखी मुलीचे नाव आहे. तर तिची मोठी बहीण राधा राम वर्मा(25) गरोदर असून गंभीर जखमी झाली. या घटनेनन्तर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत काचा फोडल्या. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी राधा पतीसह तळवडेच्या एका वर्कशॉप मध्ये कामाला आहे. राधा गर्भवती असल्याने तिच्या बाळन्तपणासाठी सुधाला गावातून बोलावून घेतले होते. मंगळवारी दोघी बहिणी जेवण आणि कामे आटपवून परत जात असताना रस्ता ओलांडत होत्या. 
ALSO READ: पुणे महानगर पालिकेने पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण रोखण्यासाठी ARAI ला दिली मान्यता
त्याच वेळी तळवडेकडून निगडीकडे जाणाऱ्या भरधाव पीएमपीएमएल बसने त्यांना जोरात धडक दिली. 
या धडकेत 9 वर्षाच्या सुधाचा जागीच मृत्यू झाला. तर गर्भवती राधा जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ALSO READ: पुणे: नवले पुलावर अपघात; शाळेची बस कारला धडकली
घटनेची माहिती मिळतातच देहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी बस चालकाला अटक केली. 
घटनेनन्तर संतप्त नागरिकांनी बसचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल बसवर दगडफेक करत काचा फोडल्या.यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले