पियानो वादनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका शाळकरी मुलासोबत शिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.या घटनेनन्तर मुलाच्या आईने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद केली असून पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा विमानतळ परिसरात एका पियानो क्लास जातो. या ॲकॅडमीतील एका व्यक्तीने 8 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास या मुलासोबत अश्लील कृत्य केले.
यामुळे मुलगा घाबरला आणि त्याने घरी गेल्यावर आईला घडलेलं सर्व सांगितले.
मुलाच्या आईने त्वरित विमानतळ पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच घटनेचे गांभीर्य पाहून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.