पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. सलमान राधेश्याम बर्डे असे या चिमुकल्याचं नाव आहे .या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पवन जोगेश्वरपांडे ला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमानचे वडील मूळचे मध्यप्रदेशातील आहे. ते कामानिमित्त वाकडच्या वीटभट्टी परिसरात राहतात. ते जिथे राहतात त्याच्या घराजवळ एका उसाच्या दुकानात आरोपी पवन काम करायचा. पवन ने सलमानच अपहरण करून नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.
पवन ने सलमानच अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा खून करून मृतदेह बावधनच्या कचऱ्याच्या टेकडीच्या जवळ फेकला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पवन पांडे याला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा तपास करत आहे.