Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर दहशत माजवल्याचा प्रकरणात निलेश घायवळ विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

crime
, शनिवार, 18 ऑक्टोबर 2025 (08:28 IST)
सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या रील प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ याच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेशच्या विरोधात आतापर्यंत सात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
या बाबत पोलीस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, निलेश घायवळ तसेच समाज माध्यमातील घायवळ खाते चालवणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमातून दहशत माजवणारी चित्रफीत प्रसारित करत गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी ( Nilesh Ghaywal)कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला घायवळ हा युरोपात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.
 घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited By - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pakistan-Afghanistan: युद्धबंदी दरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानवर नागरिकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले