Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्चना आत्राम ठरल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक

अर्चना आत्राम ठरल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक
, शुक्रवार, 9 जून 2023 (17:09 IST)
First Women ST Driver राज्यात एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला चालकाने एसटीचे स्टेअरींग हातात घेतले आहे. राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक होण्याचा मान अर्चना अत्राम यांना मिळाला आहे. आत्राम यांनी सासवड ते नीरा या मार्गावर बस चालविली. 
 
या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याचे सर्वीकडे कौतुक केले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.
 
चाकणकर यांनी महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की "नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा. अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा. अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!"
 
एसटी सुरु झाल्याच्या तब्बल 75 वर्षांनी एखाद्या महिलेच्या हातात एसटीचे स्टेअरींग आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आहे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना वाचा पूर्ण माहिती