Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मावळात ‘बजाज विशेष कोविड लसीकरण’ दिवस, 15 हजार डोस उपलब्ध

मावळात ‘बजाज विशेष कोविड लसीकरण’ दिवस, 15 हजार डोस उपलब्ध
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (08:44 IST)
पुणे जिल्हा परिषद पुणे व बजाज कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यासाठी कोविशिल्ड लशीचे 15 हजार डोस उपलब्ध झाले असून (मंगळवार, 31 ऑगस्ट) संपूर्ण मावळ तालुक्यात बजाज लसीकरण विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष लसीकरण मोहीमेचा मावळातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
 
लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी स्पर्धा करताना लसीकरण केंद्रांवर होणारे अनावश्यक वादविवादाचे प्रसंग टाळून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.प्रत्येकाचे लसीकरण होईपर्यंत शासनामार्फत लसीकरण सुरूच राहणार आहे.त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी व कोविडचे नियम पाळून कोविड मुक्त मावळसाठी प्रयत्नांना साथ द्यावी, अशी विनंती आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेला केली आहे.
 
या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय,नगरपरिषद कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्र असे एकूण 40 ठिकाणी 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्डच्या पहिल्या व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसरा डोससाठी लसीकरण होणार आहे.तरी कोविडचे सर्व नियम पाळून गर्दी न करता सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
 
कोविशिल्ड लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.
18 वर्षापुढील सर्व व्यक्तींसाठी पहिला डोस व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी खालील केंद्रांवर लसीकरण सुरु राहतील.प्राथमिक तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र,तळेगाव जनरल हॉस्पिटल रिक्रिएशन हॉल,खडकाळा प्राथमिक आरोग्य केंद्र,कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र,टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्र,येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र व आढले प्राथमिक आरोग्य केंद्र.
 
तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र – आंबी,इंदोरी,निगडे,सदुंबरे,नवलाख उंबरे.टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र :नागाथली.खडकाळा प्राथमिकआरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र :वडगाव, करंजगाव, साते व सांगिसे. कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र :टाकवे खुर्द,भाजे व कुसगाव.येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र :महागाव,कोथुर्णे व बौर.आढले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र : बेबेड ओहोळ, शिवणे,दारुंब्रे,गहुंजे,चांदखेड व सोमाटणे
 
या खेरीज खंडाळा प्राथमिक आरोग्य पथक, लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील शंखेश्वर,रेल्वे स्टेशन, एल अँड टी हॉस्पिटल ही केंद्रे,कान्हे येथील वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालय,वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये वडगाव उपकेंद्र व इतर पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
 
लोणावळा व तळेगाव नगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिरिक्त केंद्राबाबत संबधित मुख्याधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय लोणावळा/ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे हे लस व मनुष्यबळ उपलब्धता लक्षात घेऊन याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे.
 
या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त केंद्रांवर लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे.सर्व केंद्रांवर सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यानंतरही आवश्यकतेनुसार लसीकरण सुरू राहील. लसीकरणासाठी एकदम गर्दी करू नये.
 
सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गेले दीड वर्षापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोविड रुग्णांच्या उपचारात सहभागी आहे. तसेच गेल्या सात महिन्यांपासून लसीकरणाच्या कामकाजामध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामकाज पाहत आहे. त्यामुळे आजपर्यंत मावळ तालुक्यात 1 लाख 77 हजार 683 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ‘कोरोना’चे 3,741 नवीन रुग्ण, तर 4,696 जणांना डिस्चार्ज