Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा – आमदार माधुरी मिसाळ

बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा – आमदार माधुरी मिसाळ
, शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:25 IST)
फोटो साभार- सोशल मीडिया 
बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

मिसाळ म्हणाल्या, ‘गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन दिले आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत लवकरच राज्य शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला जाईल.’

क्षितिजा व्यवहारे या आठवीत शिकणार्या चौदा वर्षे वयाच्या मुलीचा एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरामध्ये धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून १२ ऑक्‍टोबरला संध्याकाळी खून केला होता. ती कबड्डी खेळाडू होती. यश लॉन्स परिसरात ती कबड्डीचा सराव करीत होती. या गंभीर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

अनेक गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. खरं तर अशाप्रकारचे गुन्हे करण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अल्पवयीन मुलांचा गैरवापर करीत असतात. कायद्यातील तरतुदींमुळे ही मुले निर्दोष सुटतात. त्यामुळे कायद्यात बदल करणे आवश्यक वाटते. विधिमंडळात आणि कायदे तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, अशी ही मागणी मिसाळ यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भूमाफियांचा मास्टरमाइंड रम्मी राजपूतची रवानगी अंडा सेलमध्ये