Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले

भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (22:30 IST)
पिंपरी -चिंचवडचे माजी महापौर आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी कर्करोगाने निधन झाले.ते अंनतात विलीन झाले.  त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
त्यांच्या अंत्यसंस्कारात शहरातील सर्व पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, आणि त्यांचे चाहते मोठया संख्येने उपस्थित होते. 

आमदार जगताप हे कर्करोगाने ग्रसित असून ते कर्करोगाशी झुंझ देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पिंपळे गुरव येथे त्यांच्या निवास स्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार, महेश लांडगे, सहकार मंत्री अतुल सावे, सुनील शेळके, अण्णा बनसोडे, बाळाभेगडे, माजी आमदार विलास लांडे, इत्यादी सर्व पक्षीय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. 

सायंकाळी फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांच्या निवासस्थानापासून गावठाण मैदानापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी 5:30 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैरी झाडात पोलिसांनी त्यांना सलामी दिली. अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. 

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्फी जावेद-चित्रा वाघ : नग्नता नेहमीच अश्लील असते का?