Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

पुणे हादरलं! चारित्र्यावर संशयातून दिराने महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले

crime
, गुरूवार, 6 एप्रिल 2023 (14:40 IST)
पुण्यातील कोंडवा भागात पिसोली येथे एका धक्कादायक घटनेत दिराने महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले. चारित्र्यावर संशय आल्याने दिराने सख्खी वहिनी आणि तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले. घटनेची माहिती मिळताच कोंडवा पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी वैभव वाघमारे याला अटक केली. मृत आम्रपाली वाघमारे आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
 
पोलिसांप्रमाणे वैभव वाघमारे हा कोंढवा येथील पिसोळी परिसरात कुटुंबासह राहत होता. प्राथमिक माहितीनुसार वैभवला त्याची वहिनी आम्रपालीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून वैभवने मध्यरात्री आम्रपाली आणि तिच्या दोन निष्पाप मुलांना पेट्रोल शिंपडून जाळले. तिघांचा जागीच मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच कोंडवा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. मात्र शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वैभवने आधीच वहिनी आणि दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिघांनाही जाळले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

9 हजारात Hero Splendor बाईक