Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बस जळून खाक, सुदैवाने बचावले सर्व प्रवासी

fire
, मंगळवार, 25 मार्च 2025 (13:27 IST)
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 78 किमी जवळ शेफाली ट्रॅव्हल्सची बसला आज मंगळवारी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला. कोल्हापूरहून मुंबईकडे जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस हायवेच्या खाली उतरली.
या अपघातांनंतर बसला आग लागली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी बचावले आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य करण्यात आले कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण  मिळवले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. नंतर आगीवर नियंत्रण मिळवल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. घटनेचा तपास शिरगाव पोलीस करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील धारावी येथे मोठा अपघात, एकामागून एक अनेक सिलिंडरचा स्फोट