Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

मुख्यमंत्र्यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भेट

shinde meet prakash amte
, बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:13 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्यातील रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुणे दौऱ्यावर होत. या दरम्यान, यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ. आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबीयांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी डॉ. आमटे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते.
 
शिवसेनेमध्ये बंडाचा झेंडा फडकावून भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ व्यक्तींची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठ शिलेदारांपैकी हयात असलेल्या मनोहर जोशी आणि लिलाधर डाके या दोन शिलेदारांची भेट घेतली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईडीकडून येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहारात ४१५ कोटीच्या मालमत्तेवर टाच