पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या रूग्णांनी मुंबई-पुणे प्रवास ज्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत केला त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासह बीडच्या तिघांनी देखील दुबई प्रवास केला होता. या तिघांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.
या तिघांना अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही. पण तरीही खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाची देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 दिवसांपर्यंत कोरोनाची लागण होण्याची भीती असते. भारतात आल्यावर दहा दिवस लोटले आहेत. अजून अठरा दिवस आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून राहणार आहेत.
दुबईला 40 जणांचा ग्रुप खासगी टूरिस्ट कंपनीसोबत दुबईला गेले होते. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत दुबईचं नाव नव्हतं. यामुळे ही टूर करण्यात आली.