Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीमा कोरेगावसह ११ गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत प्रवेश बंदी

भीमा कोरेगावसह ११ गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत प्रवेश बंदी
, शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:42 IST)
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारीला लाखो नागरिक येत असतात. पण यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगावसह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
 
भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील चित्रपटांसंबंधी काम करणाऱ्या चार संस्थांचे विलिनीकरण