Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी ने अटक केले

mangaldas bandal
, बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:47 IST)
facebook mangaldas bandal
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या निवासस्थानातून 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळली आहे. या व्यतिरिक्त पाच गाड्या, 1 कोटींच्या किमतीचे 4 मनगट घडल्याळ आढळले आहे. ईडी ने काल सकाळ पासून बांदल यांची चौकशी घेतली 16 तासा नंतर त्यांना रात्री 11:30 वाजता अटक केली. आज दुपारी त्यांना मुंबई कोर्टात हजर केले जाणार आहे.या मुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.   
 
मंगळवारी सकाळी 7 वाजता पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या घरी ईडीने धाड टाकली त्यांच्या शिक्रापूर आणि हडपसरच्या घरी ईडीने कारवाई करायला सुरु केली.या धाडीत त्यांना घरातून 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम मिळाली. बांदल यांची कसून चौकशी करण्यात आली शिक्रापूरच्या घरात त्यांच्या पत्नी, दोन भाऊ आणि इतर कुटुंबीयांची ईडी कडून चौकशी करण्यात आली.   

आज दुपारी बांदल यांना मुंबईच्या कोर्टात हजर करणार आहे. बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैर व्यवहार प्रकरणात प्रदीर्घकाळ येरवडा तुरुंगात होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहे. पूर्वी देखील ईडीने नोटीस बजावत त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी चौकशीसाठी हजेरी दिल्यानंतर ईडी कडून कारवाई करण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 5 जण होळपले