राज्यात आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील रिक्त परीक्षा पेपर फुटीमुळे स्थगित करण्यात आली असून पुणे सायबर पोलीस सेल ने राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात अडकलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या असून सुपेंच्या घराची झडती घेतल्यावर त्यांच्या घरात पैसे, एफडी ,सोनं आणि कोट्यावधीं रुपयांच घबाड सापडलं आहेत .
म्हाडा परीक्षा जी.ए सॉफ्टवेअर कडून घेण्यात आली होती . आणि टीईटी परीक्षा देखील याच कंपनीकडून घेतली होती . टीईटी परीक्षेत कंपनीचे मालक डॉ .प्रितेश देशमुख यांनी दोन एजेंटसह राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि सल्लागार पदी असलेले अभिषेक सावरीकर यांनी उमेदवारांकडून लाच घेऊन पास केले.
पोलिसांनी सुपे यांची कसून चौकशी करताना त्यांनी आपला गुन्हा कबूल केला .सुपे यांनी उमेदवारांकडून तब्बल 1.70 कोटी रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुपेंच्या घराची झडती घेतल्यावर त्यांना 5 ग्राम सोन्याची नाणे पाचलाख पन्नास हजाराची एफ डीची कागदपत्रे , आणि 88 लाख 49 हजार 980 रोख रक्कम असं कोट्यावधीं रुपयांच घबाड सापडले आहे.