पुण्यात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आपत्तीचा पाऊस असल्यचाे दिसत आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवस यांनी दिले आहेत.
पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट शिखरावर अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर इतर भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कोकणातील सातारा जिल्ह्यातील रायगड, घाट शिखरावर मुसळधार पावसासाठी 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटशिखरात मुसळधार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. काही लोक सोसायटी सोडून निघून गेले आहे. शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. हा पाऊसही जीवघेणा ठरत आहे. पुण्यात करंटमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. सिंहगड रोडवर देखील गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले आहे तर शहरातील किमान 15 सोसायट्यांमध्ये पावासाचे पाणी शिरले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळांना सुट्टी घोषित केली गेली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अजित पवार यांनी सद्यस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.