Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 18 March 2025
webdunia

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका
, शनिवार, 8 मार्च 2025 (20:57 IST)
पुण्यात  एका श्रीमंत माणसाच्या मुलाने आपल्या बीएमडब्ल्यू मधून उतरून मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध्ये लघवी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाचा शोध सुरु केला आहे. स्थानिक लोकांनी त्या तरुणाला ढकलले तेव्हा त्याने आक्षेपार्ह वर्तन केले. 
दरम्यान, स्थानिक लोकांनी या तरुणाचा व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनीही ही घटना गांभीर्याने घेतली. पुण्यात या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कारवाई पूर्ण झाल्यावर आरोपी ताब्यात घेतल्यावर या संबंधीची माहिती दिली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. 
आरोपी मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपी अल्पवयीन नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन