Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे विभागात सुमारे २२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला ‘डोस’ मिळाला

पुणे विभागात सुमारे २२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला ‘डोस’ मिळाला
, शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:32 IST)
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून गेल्या दहा दिवसांमध्ये पुणे विभागात सुमारे २२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला ‘डोस’ मिळाला आहे. त्यामुळे येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह सातारा, सोलापूर जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली आहे.
 
पुणे विभागात एकूण एक लाख ६५ हजार २९७ एवढे लाभार्थी आहेत. त्यामध्ये ५५ हजार ६०४ एवढे सरकारी; तर एक लाख नऊ हजार ६९३ एवढे खासगी रुग्णालयातील लाभार्थी आहेत. त्यात डॉक्टर, परिचारिका; तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी ३६ हजार ३०७ जणांना आतापर्यंत गेल्या दहा दिवसांमध्ये लसीकरण झाले आहे. एकूण २१.९६ टक्के जणांना लस मिळाली आहे.
 
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २२.१० टक्के जणांनी म्हणजेच नऊ हजार ५८३ लाभार्थ्यांनी लस घेतली. त्यापाठोपाठ पुणे शहरात ५४८६ (११.८६ टक्के) जणांनी लस घेतली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयातील काही केंद्रे बंद असल्याने लसीकरणाच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या लसीकरणाची तुलना करता पुणे विभागात सर्वाधिक कमी लसीकरण पुण्यात झाले आहे, असे आरोग्य खात्याच्या विश्लेषणातून दिसून आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३९९१ जणांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण लसीकरणाचे प्रमाण १७.२६ टक्के असून, जिल्ह्यात १९ हजार ६० जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.
 
सातारा जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ८४७८ जणांनी लस घेतली असून, ३४.३५ टक्के जणांचे लसीकरण झाले आहे. पुणे विभागात गेल्या दहा दिवसांत सर्वाधिक लसीकरण सातारा जिल्ह्यात झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात २९.०५ टक्के अर्थात ८ हजार ७६९ जणांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे एकूण पुणे विभागात २१.९६ टक्के लसीकरण झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना काळातील बेरोजगारीमुळे तरुणाने आयुष्य संपवल