Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात ‘टाटा मोटर्स’च्या नावाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक

पुण्यात ‘टाटा मोटर्स’च्या नावाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक
, मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:25 IST)
टाटा मोटर्स  कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही जणांनी मुरुड येथील एका तरुणाची पुण्यात  फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच पद्धतीने 15 युवकांची फसवणूक झाल्याबाबत पुणे सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी ग्राहक पंचायतीकडे तक्रार आल्यावर त्यांनी थेट टाटा मोटर्स कंपनीत संपर्क साधला. त्यावेळी या तरुणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विलास लेलेयांनी याबाबत माहिती दिली. मुरुडहून पुण्यात आलेल्या एका युवकाला टाटा मोटर्समध्ये स्टोअर किपरची  नोकरी असल्याचा फोन आला. त्यासाठी अर्जाचे 1500 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर परीक्षा शुल्क, प्रशिक्षण शुल्क अशा वेगवेगळ्या कारणाने त्याच्याकडून 9 वेळा पैसे घेतले. अखेरीस या तरुणाने तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्याला टाटा मोटर्सच्या प्रवेशद्वारावर भेटण्यास बोलावले. त्याठिकाणी तुला लॅपटॉप  देण्यात येणार असल्याचे सांगून पुन्हा पैसे घेतले व भेटायला बोलवणारा गायब झाला.
फसवणूक झालेल्या युवकाच्या आत्याने त्याला पंचायतीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती लेले यांनी दिली. तक्रारदार आल्यावर लेले यांनी थेट टाटा मोटर्सच्या व्यवस्थापकांबरोबर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी नोकरीसाठी म्हणून कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच रोज काही युवक याबाबत विचारणा करण्यासाठी येत असल्याने त्यांना प्रवेश नाकारून कंपनीच्या संकेतस्थळावर नोकरी नाही, असे निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तरुणांनी सावधगिरी बाळगावी
लेले यांनी सांगितले की, तरुणांनी नोकरीसाठी प्रयत्न करत असताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना याची सावधगिरी बाळगावी.15 जणांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे घेण्यात आले. फसवणूक झालेल्या तरुणाला आलेले फोन कॉल, मोबाईल क्रमांक,ज्या खात्यामध्ये पैसे जमा केले तो खाते क्रमांक, कंपनीच्या प्रवेशद्वारावर भेटलेल्या व्यक्तीचा नंबर व चेहरेपट्टी अशी सर्व माहिती सायबर गुन्हे शाखेला  देऊन तक्रार करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी