Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे पोलिसांच्या सायकल पेट्रोलिंगचं उद्घाटन

पुणे पोलिसांच्या सायकल पेट्रोलिंगचं उद्घाटन
, शनिवार, 20 मार्च 2021 (09:47 IST)
प्रथमच आता पुणे पोलीस कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सायकलवरून गस्त घालणार आहेत. येथे असणाऱ्या छोटछोट्या गल्लीत देखील आता या सायकलच्या माध्यमातून पोलीस पोहचणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. समर्थ पोलीस ठाण्यात आजपासून हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे.
 
समर्थ पोलीस ठाण्याला या अद्यावत अश्या 10 सायकली महापालिकेच्या वतीने सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्या. सायकल पेट्रोलिंगचे उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, 25 वेळा आयर्नमॅन पदक विजेते कौस्तुभ राडकर उपस्थित होते. यावेळी 60 सीसीटीव्ही बसवणे आणि स्पोर्ट्स ग्राऊंडचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
 
मध्यवस्तीत छोटछोट्या गल्या आहेत. येथे वाहने घेऊन जाने कठीण असते. अश्यावेळी एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिसांना पोहचणे शक्य होत नाही. किंवा विनाकारण वेळ लागतो. पण आता या परिसरात पोलीस वेळेत पोहचणार आहेत. तसेच त्यामुळे लवकर मदत देखील मिळणार आहे. आता समर्थ पोलीस ठाण्याचे  कर्मचारी गस्त घालताना या सायकलचा वापर करणार आहे. अद्ययावत अश्या या सायकल असून, तिला सात गिअर आहेत. दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस सायकलवरून गस्त घालणार आहेत. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांना दररोज काही अंतर सायकल चालवणे बंधन आहे. त्याचा पुणेकरासोबतच पोलिसांना देखील फायदा होणार असून, पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एनआयएने सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले