Publish Date: Fri, 08 Jul 2022 (21:30 IST)
Updated Date: Fri, 08 Jul 2022 (21:36 IST)
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या धरणांच्या पाणीपातळीत जवळपास 1 टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत ते 5.45 टीएमसी इतके झाले आहे.
संपूर्ण राज्यभरात पाऊस जोरदार होत आहे. पुण्यातही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पुण्यातील धरणांमध्ये गुरुवारी सकाळी 4.51 टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 5.45 टीएमसी झाला. मागील 24 तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात 55 मिमी, पानशेतमध्ये 60 मिमी, टेमघरमध्ये 81 मिमी आणि खडकवासलामध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.