पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोणत्याही विभागाचे प्रशासकीय कामकाज ई-मेलद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका व क्षेत्रीय कार्यालयांसह पालिकेच्या आस्थापनांमध्ये नागरिक, ठेकेदार यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. तत्संबंधीत आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
कोविड 19 संक्रमण धोका विचारात घेऊन राज्य सरकारने शासकीय कामकाज ऑनलाईन, ई-मेलद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिक, ठेकेदार व इतर यांना आजपासून प्रवेश नाकारण्यात आला आहे. पालिकेशी संबंधीत प्रशासकीय कामकाज ऑनलाईन, ई-मेलद्वारे करण्यात यावे, असा आदेश आयुक्त पाटील यांनी काढला आहे. हा आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे.