Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर

pimpari chinchwad mahapalika
, शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (09:34 IST)
क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख यांने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर या शाळेला मान्यता नाही, तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या बांधकामावर बुलडोजर फिरवत कारवाई केली आहे. त्यामुळे आता शाळा बंद झाली असून पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन गेले आहेत.
 
निवासी शाळेतील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलींचे समुपदेशन करत गैरप्रकार झाला असेल तर पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर नौशाद शेख याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास करत असताना या निवासी शाळेबाबत अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या.
 
निवासी शाळेच्या वसतिगृहासाठी समाजकल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, ही परवानगी नसल्याची बाब समोर आली. तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम करत अतिक्रमण केले असल्याचेही महापालिकेने केलेल्या तपासात समोर आले. त्यामुळे या वाढीव बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार, शुक्रवारी (दि. १६) महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकाने या निवासी शाळेवर कारवाई केली. यामध्ये मेस, कार्यालय, वर्गखोल्या तसेच वेटिंग रुमसाठी केलेले वाढीव बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आली असून पालक विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. तसेच आता घरीच अभ्यास करून परीक्षा देणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शवविच्छेदनातून खून केल्याचे उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा