पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात. पण कायद्याचे हे रक्षकच भक्षक होऊ लागले तर सामान्य जनतेने कोणाकडे जावं. असेच काहीसे घडले आहे पुण्यात पुणेला विध्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरात पोलिसांनीच कायद्याला मोडून स्वतःपोलीस ठाण्यात चोरी केली आहे. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त झालेली वाहने पोलिसांनीच विकुन टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याच्या गुन्हा दाखल केल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केल्यावर आरोपीची कसून चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने सांगितले की या पैकी काही गाड्या पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी परस्पर विकायला सांगितले. असे त्याने उघड केले. या मध्ये पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.