Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात एनडीएच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide
, शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 (14:20 IST)
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) मध्ये शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. 
अंतरिक्ष कुमार (लखनौ उत्तरप्रदेश) असे  या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. अंतरिक्ष याने जुलै महिन्यात एनडीएच्या पहिल्या सत्रासाठी प्रवेश घेतला होता. त्याचे वडील माजी सैनिक होते. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिस तसेच मृत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. घटनेचे नेमके कारण समजावे यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या प्रशिक्षणास तो गैरहजर असल्याने त्याचे सहकारी विद्यार्थी त्याच्या खोलीवर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  या घटनेमुळे अकादमीत शोककळा पसरली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काबूल हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात पीटीएसवर हल्ला