Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन गडकरी : ‘बस हवेतून उडणार, मग टोल भरायला जमिनीवर यायचं की तेही हवेतच?’ सोशल मीडियावर मीम्सना उधाण

nitin gadkari
, शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (19:38 IST)
पुण्यातील वाहतुकीची समस्या हा कायमच चर्चेचा विषय. या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुणेकरांसमोर एक भन्नाट आयडिया मांडली.
 
गडकरींची आयडिया अशी होती की, पुण्यात उड्या बसची योजना आणली, तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास फायदा होईल.
 
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्येच्या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरींनी उडत्या बसची आयडिया मांडली.
 
ते म्हणाले, "आम्ही 165 रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत 60 लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो".
 
"पुण्यातील सातारा रोडवर एलिव्हेटेड रोड बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे."
 
गडकरींच्या या आयडियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन-प्रशासनावर किती प्रयत्न केले जातील याची माहिती नाही, मात्र सोशल मीडियावर या आयडियाची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी टीका केली, मीम्स शेअर केले, विनोद केले.
 
गडकरींच्या या उडत्या बसच्या आयडियावर सोशल मीडियावर आलेल्या निवडक प्रतिक्रिया आपण या बातमीतून जाणून घेऊ.
 
प्रथमेश शिरवडकर यांनी ट्विटरवर गडकरींच्या 'उडत्या बस'च्या आयडियावर सलग दोन-तीन ट्वीट केलेत. त्यातील एका ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'बस हवेतून उडणार ठीक आहे. पण त्यांनी टोल भरायला जमिनीवर उतरायचे आहे की, टोलनाके हवेत असणार आहेत?'
 
वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहतांनी 'उडत्या बस'च्या निमित्तानं गडकरींच्या पत्रकार परिषदांवरील निरीक्षणं ट्वीटमधून नोंदवलीत.
 
पुणेरी स्पिक्स नामक ट्विटर युजरनं तर व्हीडिओ मीम शेअर करत, पुण्यातील उडती बस कशी असेल, असंच दाखवून दिलंय.
 
पुणेरी स्पिक्सच्या ट्वीटला उत्तर देताना प्रवीण सावंत नामक युजरनं 'कोकणवासियांना ही बस गणेशोत्सवासाठी 11 दिवस भाड्यानं द्यावी' असं म्हटलंय.
 
मराठी रक्षक नामक युजरनं रिप्लायमध्ये आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, रस्ते खड्डेमुक्त होणं शक्य नसल्यानं गडकरींना असा विचार करावा लागला.
 
पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्राफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. "सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे", असं गडकरी म्हणाले.
 
गडकरींनी पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्गाबाबत माहिती दिली. "पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारी वाहतुक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल.
 
काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोमध्ये ढोल-ताशा वादन सुरू असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर या व्हीडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. 31 ऑगस्टला पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं, ते व्हायरल झालं.
 
पुणे मेट्रोच्या वनाज स्टेशनमध्ये 5 सप्टेंबरला जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचवर्षी 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी मेट्रोतून सफरही केली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येकी एका असा मार्ग प्रवासासाठी सुरू झाला.
 
सुरुवातीला मेट्रोच्या प्रवासाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. पण आता मेट्रोच्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ही 5 हजारावर आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chinese Loan Apps Case: पेटीएम, रेझरपे आणि कॅश फ्री स्थानांवर ईडीचे छापे