Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टर्स डेच्या दिवशीच पुण्यातील डॉक्टर दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या

डॉक्टर्स डेच्या दिवशीच पुण्यातील डॉक्टर दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या
, गुरूवार, 1 जुलै 2021 (15:01 IST)
आज देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा होत असताना पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात राहणार्‍या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. निखिल शेंडकर आणि डॉ. अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे. 
 
डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय २६) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २८ रा. आझाद नगर, वानवडी ) हे आझाद नगर वानवाडी येथे राहत होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. अंकिता यांची क्लिनिक आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी जीवन गमावला. दोघांमध्ये फोनवर शाब्दिक वाद झाल्यावर निखिल घरी पोहचला तेव्हा अंकिता घरातील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. निखिलला अंकिता ओढणीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत आढलून आल्या. 
 
डॉक्टर अंकिता यांनी गळफास घेतल्याची माहिती वानवडी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टमनंतर अंकिता यांचा मृतदेह त्यांच्या ऊरुळीकांचन येथील माहेरी नेण्यात आला. पत्नीने आत्महत्या केल्याने निखिलला मानसिक धक्का सहन न झाल्यानं त्यांनी देखील बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंख्याला गळफास लावून घेतला.
 
डॉ. निखिलनेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुकोबांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज प्रस्थान, वाचा कसा असेल यंदाचा पालखी सोहळा