Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीड वर्षाच्या नील भालेरावची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

Neel Bhalerao
, शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (14:23 IST)
दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने 2 मिनिट 53  सेकंदात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद केली आहे. नील भालेरावने केलेला विक्रम हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील त्याच्या आणखीन प्रयत्नांकडे लक्ष वेधणारा आहे. 
 
लहान वयात मोठ्या प्रमाणावर स्मरणशक्तीद्वारे नावे लक्षात ठेवत त्याला आत्मविश्वासाने सादर करणे ही बाब उल्लेखनीय असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे.पण एवढ्या लहान वयात नोंद झाली असून त्याचं महत्व अधिकच आहे. 
 
या यशामागे नीलच्या जिद्दीबरोबरच त्याचे पालक आई प्रेरणा भालेराव आणि वडील निखिल भालेराव यांचे मार्गदर्शन, सयंम आणि प्रोत्साहन ही महत्त्वाचे ठरले आहे. 
 
एवढ्या लहान मुलांमधील गुण ओळखून योग्य दिशेने प्रोत्साहन दिल्यास ते मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात.नीलच्या या यशामुळे महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनात 56 जणांचा मृत्यू