Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची 10 पथके तैनात

पुण्यातील बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची 10 पथके तैनात
, शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:38 IST)
पुणे- शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर मोठा दरोडा पडला. या बँकेमधील २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली होती. त्यांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी जोरदार कंबर कसली असून पोलिसांची दहा पथकं तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
 
पुढे अभिनव देशमुख म्हणाले, पिंपरखेड गावातील बँक दरोड्याच्या घटनेचा तपास सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दहा वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी काही सीसीटीव्हीमध्ये दिसली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तपास सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना देखील याप्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्या जिल्ह्यात देखील या आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच यातील आरोपींना अटक केले जाईल.
 
पिंपरखेडच येथे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज पोत्यात भरून कार गाडीमधून पलायन केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे