Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात कोयता गॅंग विरोधात पोलिसांची व्युव्हरचना

pune police
, बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (08:12 IST)
कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यूहरचना आखली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
 
शहर तसेच उपनगरात गेल्या दोन महिन्यांपासून कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वेगवेगळ्या भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील बहुतांश आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांना बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यामुळे मर्यादा येतात. त्यामुळे बाल गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यातील कठोर तरतुदींचा आधार घेऊन अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. तसेच, गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घालून टाकलं--एकनाथ शिंदे