पंत प्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहे. आज ते मेट्रोच्या दोन टप्प्याचे उदघाटन करणार आहे. या शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे महापालिकेत अनावरण करणार आहे. पंत प्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामाचं देखील उदघाटन होणार आहे.
पंत प्रधान मोदी यांचे सकाळी 10:25 वाजता लोहगाव विमान तळावर आगमन . नंतर ते हेलिकॉप्टर ने 10 :45 वाजता कृषी महाविद्यालय येथे जाणार.
सकाळी 11 वाजता मनपा आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. सकाळी 11:30 वाजता मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन मोदी यांचा हस्ते होणार. गरवारे ते आनंदनगर प्रवास करतील. दुपारी 12 च्या सुमारास एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदी दाखल होतील.नंतर दुपारी 12 :30 पीएमपीएल च्या 100 इ बस आणि इ बस डेपोचे लोकापर्ण करतील
नंतर दुपारी 12 :45 ला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे येथे होणाऱ्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याला उपस्थिती. दुपारी अडीच वाजता पुणे लोहगाव येथून दिल्ली कडे प्रस्थान करतील.