Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune: भरधाव कारने 5 शेतमजुरांना चिरडले, तिघांचा दुर्देवी मृत्यू

accident
, सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (11:57 IST)
कल्याण -अहमदनगर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याची घटना घडली असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहे. 
 हा अपघात कल्याण- अहमदनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यात डिंगोरे हद्दीत शेतातील कामे उरकून पायी चालत जात असलेल्या शेतमजुरांना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासणीत कळाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हे शेतमजूर मध्यप्रदेशातून मजुरीसाठी आले होते. शेतीचे काम उरकून ते पायी चालत जात असताना हा अपघात झाला. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asian Games 2023: भारताने आज पाच पदके जिंकली, एकूण पदकांची संख्या 10