Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
पुणे , सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (17:12 IST)
पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात गुरं बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
नेमकं काय घडलं?
शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरं- ढोरं बांधत होती. त्यावेळी आरोपी अनिल आणि महेश तिथे अचानक गेले. त्या नंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी अनिल आणि महेश यांनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित मुले