पुणे - येथे धुमाकूळ घालणारी कोयता गँग पुन्हा एकदा सक्रीय झाली असल्याचे दिसून येत आहे. सदाशिव पेठ येथे एका महाविद्यालयीन तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्याने पुणे हादरले होते. आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सुरा व कोयता घेऊन धमकावणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे.
या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सविस्तर माहितीनुसार, पुण्यामधील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कोयता व सुरा घेत विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांची कॉलेजमध्येच धिंड काढली आहे. गुंडांमध्ये ९ जणांचा सामावेश असून, त्यातील २ जण हे याच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. हे गुंड विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांच्याकडून पैश्याची मागणी करणे असे कृत्य करत कारवाई केली आहे.
त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांना अटक करून कॉलेजमध्येच त्यांची वरात काढत धुमाकूळ घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी ही कृती केली आहे. सदाशिव पेठ येथे युवतीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor