Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune: कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी- मोहिते यांचे निधन

Shradhanjali RIP
, शनिवार, 1 जुलै 2023 (15:51 IST)
सर सेनापती हंबीरराव बाजी- मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव बाजी- मोहिते यांचे वयाच्या 98 वर्षी अल्पशा आजाराने पुण्यात30 जून रोजी निधन झाले. 

कॅप्टन हंबीरराव हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रातोजी राजे यांचे वंशज होते. कॅप्टन हंबीरराव हे मराठा लाईफ इन्फ्रंटी कडून 20 व्या वर्षी दुसऱ्या युद्धात सहभागी झाले. त्यांनी इटलीच्या युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याच्या विरोधात प्लॅटून टॅंक कमांडर म्हणून कर्तव्य बजावले.

त्यांची नेमणूक महायुद्धानंतर मित्र देशांच्या जपान मुख्यालयात करण्यात आल्यामुळे त्यांचा संबंध जपानी संस्कृती आणि सभ्यतेशी आला.हे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले. त्यांच्या कुटुंबातील 7 पिढ्यांनी आपले अमूल्य योगदान भारतीय लष्करी सेवेत दिले आहे. महायुद्धात बाजी -मोहिते यांनी सैनिक आणि अधिकाऱ्यांनी भारतीय लष्करात आपले नाव केले. हंबीरराव यांच्या वडिलांच्या निधनामुळे ते लष्करी सेवेतून लवकर निवृत्ती घेऊन कौटुंबिक जबाबदारी आणि शेती सांभाळली. आणि आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान वापरले. 

हंबीरराव यांची नेमणूक कृषीमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील आणि अर्थमंत्री धनंजयराव गाडगीळ यांनी देशातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर म्हणून केली. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा संस्थेत काम केले. महाराष्ट्रातील सातारा येथे "सैनिक स्कूल " स्थापना करण्यासाठी त्यांनी सरकारला म्हह्त्त्वाचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना , नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावर 2 जुलै रोजी पुण्यात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील .
 
 


Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

France Violence: फ्रान्समधील हिंसाचार, कुठे पोलिसांना लक्ष्य करण्यात आले, तर कुठे बँक फोडण्यात आली