सध्या पुणे रेल्वे स्थानकावर समस्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीत दोघांपैकी एक दुसऱ्याच्या डोक्यापर्यंत उचलून आपटत होता. सध्या पुण्याच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण झाल्याचे समजत आहे.
या हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सध्या पुणे स्थानकावर गुंडाराज असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत आहे. सध्या पुणे स्थानक म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी काही स्थिती झाली आहे.
पुणे स्थानकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्या मध्ये दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. या व्हिडीओ मध्ये एक जण दुसऱ्याला डोक्यापासून उचलून जोरात आपटत होता तर खाली पडणाऱ्याचे डोकं आपटण्याचा जोरदार आवाज येत होता. मात्र कोणीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा रेल्वे प्रशासन देखील आले नाही.