Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तात्पुरता स्थगित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तात्पुरता स्थगित
, बुधवार, 10 मार्च 2021 (17:11 IST)
कोरोना रुग्णांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेता 19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या 18 ते 25 मार्च दरम्यान होईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविली आहे.
 
कोरोना रुग्णांच्या वाढीचा फटका पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बसाला आहे. सलग दुसऱ्यांदा महोत्सवाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले,  शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहात येण्याविषयी प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी आपली चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सावासाठी केलेली नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सावासाठी बदलून मिळू शकते का? अशी विचारणा आमच्याकडे केली. आयोजक म्हणून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांपर्यंत महोत्सव पोहोचावा अशी आमची प्रामाणिक इच्छा असते, मात्र सध्याच्या परिस्थितीत हेच उद्दिष्ट साध्य होईल कि नाही  याविषयी शंका असल्याने महोत्सव काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे शहरात नवे 40 कंटेन्मेंट झोन