Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

Pune News :पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला भीषण आग लागली

Pune News: Big Basket godown catches fire in Pune Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (10:00 IST)
पुण्यात बावधन मधील बिगबास्केटच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने किराणा सामान आणि 
भाजीपाला जळून खाक झाले.आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण केले.या भीषण अग्निकांडात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.रात्री अकराच्या सुमारास ही आग लागली.आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

आग लागल्याचे कळतातच अग्निशमनदलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.या आगीत किराणा सामान,धान्य,भाजीपाला,इतर सामान जाळून खाक झाले आहे.सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या गोडाऊन मध्ये ठेवलेल्या अनेक गाड्या जळाल्या आहे. कोथरूड, पाषाण, कात्रज, सिंहगड,हिंजवडी येथील अग्निशमनदलाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या.

स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार,स्टोअर बंद झाले त्यामुळे आत कोणीच न्हवते.सुरुवातीला एका कोपऱ्यात आग लागली नंतर आग भडकली.परिसरात मोठा जाळ दिसत होता.ऑनलाईन सामानाची नोंदणी करून घरोघरी पार्सल पोहोचण्यासाठी लागणाऱ्या गाड्याही जळाल्या आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात रविवारी ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळले