Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' अटीसह पीएमपीएमएलची प्रवास बस वाहतूक सुरु

'या' अटीसह पीएमपीएमएलची प्रवास बस वाहतूक सुरु
, शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:28 IST)
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची प्रवाश्यांसाठीची वाहतूक सेवा  सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात 421 बस 190 मार्गावर धावत आहे. त्यात दहा वर्षाच्या आतील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना बस मध्ये प्रवेश नाही. याशिवाय प्रत्येक बसस्टॉपवर बस सॅनिटायझ केली जाणार असून ५० टक्केच प्रवाश्यांना प्रवासाची संधी दिली जाणार आहे.
 
प्रवाशांना बसच्या बाहेर आणि आत सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे. बसमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयपीएलमध्ये कोरोना संकट कायम, बीसीसीआय वैद्यकीय पथकातील एका सदस्याला कोरोना