Publish Date: Wed, 27 Sep 2023 (08:45 IST)
Updated Date: Wed, 27 Sep 2023 (08:49 IST)
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुणे दौ-यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे. पी. नड्डा दाखल झाले. मात्र, त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली. देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर जावे लागले. दरम्यान पाऊस सुरू असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पुण्यातील एका मंडळात गणपतीची आरती करत असताना अचानक आग लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना बाहेर काढले. त्या संबंधित एक व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये आग लागल्यानंतर पोलिसांनी जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर काढले.
Edited By - Ratnadeep ranshoor