Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किळसवाणा प्रकार : समोसा मध्ये कंडोम टाकला, कंत्राट परत मिळवण्यासाठी केला प्रकार

किळसवाणा प्रकार : समोसा मध्ये कंडोम टाकला, कंत्राट परत मिळवण्यासाठी केला प्रकार
, बुधवार, 10 एप्रिल 2024 (09:55 IST)
पुणे : पुण्यातून किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले होते. ते परत आपल्याला मिळावे यासाठी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोस्यात कंडोम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, औंध येथील एक कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट घेते. ही कंपनी पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित कंपनीचं कॅन्टीन चालवायची. या कंपनीने सुरुवातीला एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीने पुरविलेल्या समोस्यामध्ये प्रथमोपचार पट्टी आढळून आल्यामुळे त्यांच्यासोबत समोसा पुरविण्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आणि त्यांच्याजागी मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीसोबत करार करण्यात आला. ही बाब एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या मालकाला समजताच त्यांनी कट रचला.
 
रहीम शेख, अझर शेख आणि मजहर शेख या एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या तिन्ही मालकांनी आपल्या कटात फिरोज शेख आणि विक्की शेख या कामगारांना सहभागी करून घेतले. या दोन्ही कामगारांना विश्वासात घेऊन आरोपी मालकांनी त्यांना मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीत कामाला पाठवले. या कामगारांनी एसआरएस कंपनी मालकांनी सांगितल्याप्रमाणे समोसमध्ये  कंडोम, तंबाखूजन्य पदार्थ आणि दगडं भरले.

हे समोसे नामांकित कंपनीच्या कॅन्टीन मध्ये पोहचले. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी जेव्हा हे समोसे खाल्ले तेव्हा हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला. याप्रकरणी औंध येथील खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानुसार चिखली पोलिसांनी फिरोज या कामगाराला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, हा तर पीएचडीचा विषय : बच्चू कडू