Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता

पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:13 IST)
गेल्या काही दिवसांच्या राज्यातल्या कोरोना आकडेवारी प्रादुर्भाव कमी होताना  दिसत आहे. वाढतं लसीकरण आणि आटोक्यात असलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर आता पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
 
“पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवडची परिस्थिती बरी आहे. काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत येत्या १ तारखेला (१ ऑक्टोबर) बैठक होईल. करोनाच्या कोणत्या नियमांमध्ये शिथिलता देता येईल याबाबत सगळे आमदार, खासदार, अधिकारी मिळून घेणार आहोत”, अशी माहिती यावेळी बोलताना अजित पवार यांनी दिली.
 
दरम्यान, स्विमिंग पूलबाबतच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. “स्विमिंग पूलबाबत आपण खेळाडूंना परवानगी दिली होती. आता दोन्ही डोस झालेल्या सामान्य नागरिकांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण हे सगळं होत असताना ग्रामीण असो वा शहरी भाग असो, मास्क सगळ्यांनी वापरलंच पाहिजे. त्यात तडजोड केली जाणार नाही. हे संकट नियंत्रणात यावं आणि संपून जावं, त्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. तशा सूचना पोलीस आणि वरीष्ठांना दिल्या आहेत”, असं ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live Updates : ओवल ऑफिसमध्ये पीएम मोदी आणि जो बिडेन यांच्यातील द्विपक्षीय बैठक सुरू