Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ , फी वाढी विरोधात आंदोलनाचा इशारा

savitri bai fule collage
, बुधवार, 27 एप्रिल 2022 (15:28 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या फी वाढीचा आर्थिक भार विद्यार्थ्यांना सोसावा लागणारा आहे. त्यामुळे ही फी वाढ मागे घ्यावी नाहीतर आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
 
पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या शुल्कवाढीचा मोठा भार विद्यार्थ्यांवर पडणार आहे. आधीच महागाईमुळे, शैक्षणिक खर्च वाढला आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ मागे घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. शुल्क वाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असे विद्यापीठ प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आलं आहे.  तसेच अनेक विद्यार्थ्यांना या फी वाढीमुळे परीक्षा ही देता येणार नसल्याचं म्हटलं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय विद्यापीठाने मागे घ्यावा अशी विनंती विद्यार्थी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरसीबीचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा रियान पराग यांच्यात भांडण