एका पुणेकरानं ट्रॅफिक पोलिसांचा निषेध करत चक्क त्याच्या दुचाकीचं स्मारक उभारलं आहे. सचिन धनकुडे नावाची ही व्यक्ती असून जून महिन्यात ट्रॅफिक पोलिसांनी उचललेली गाडी ८० दिवसांनंतर परत केली. यावेळी झालेल्या मनस्तापाचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडे यांनी हे स्मारक उभारल आहे.
कोथरूडच्या भुसारी चौकात स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या या बांधकामाच्या वर सचिन धनकुडे यांनी आपली दुचाकी ठेवली आहे. स्मारकाच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी वेगवेगळे संदेश पाट्यांच्या डिझाईनवर लिहिले आहेत. यामध्ये, भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे, पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. यातून पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासोबतच आपली गाडी चूक नसताना उचलली असल्याचा देखील त्यांनी निषेध केला आहे.