Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली

webdunia
शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (11:56 IST)
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये सुपे  यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सुपे यांना गुरुवारी सायंकाळी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्रभर चौकशी केल्यानंतर आज सकाळी त्यांना अटक केल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस सायबर सेल कस्टडी सुपे यांना थोड्याच वेळात शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद Maha TETआणि शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. ज्या विद्यार्थ्यांनी B.Ed आणि D.Ed केले आहे, त्यांची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेतली जाते. सुपे यांच्या अटकेनंतर आता टीईटी परीक्षेतील मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. काही वेळात पुणे पोलीस याप्रकरणी मोठा खुलासा करू शकतात. सुपे  यांच्या अटकेनंतर राज्याचे शिक्षण विभाग याबाबत काय कारवाई करते, हे पाहणे बाकी आहे.
 म्हाडाच्या पेपरफुटी घोटाळ्यातील आरोपी प्रितेश देशमुखच्या घरी टीईटी परीक्षेचे ओळखपत्र मिळाल्यानंतर टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. प्रीतिश हा पुण्यातील जीए टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीचा प्रमुख आहे. उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपर प्रिंट करणे, परीक्षा आयोजित करणे, पेपर गोळा करणे, स्कॅन करणे आणि निकाल जाहीर करणे ही जबाबदारी तंत्रज्ञान कंपनीकडे असते. या कंपनीवर महाराष्ट्रातील 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये विविध भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रितिशच्या अटकेनंतर आता कंपनीच्या सर्व परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
प्रितीशनेच पेपर लीक केल्याचे समजते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि पुणे पोलिसांना देशमुख आणि सुपे यांच्यात संबंध आढळून आला. यानंतर तुकाराम सुपे यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. थोड्याच वेळात पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आणखी खुलासे करू शकतात.सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' नेत्याने दिले 'असे' विवादग्रस्त विधान